Sunil Danke

माझी ती मैत्रीण अशीच असावी……
खोटे बोललो की चटकन पकडून खुप सुनावणारी ,
माझं काही चुकलं तरी मला सावरून वाट दाखवणारी ,
तिच्याही मनातलं नकळत मला सांगणारी
अन माझ्या मनातलं अलगद ओळखणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……
ओरडल्यावर मला ती खुप तिखट वाटावी
अन लाडाने बोलल्यावर दुधावरच्या सायसारखी वाटावी ,
मला तिचा गुंतलेला प्रोब्लेम हक्काने सांगणारी
अन माझा प्रोब्लेम चटकन मिनटात सोडवणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……
कुठे हरवलो मी तर लगेच इंद्रधनुप्रमाणे क्षितिजावर दिसावी
अन दिसल्यावर 'विसरलास कारे मला' म्हणून जाब
विचारणारी ,
कितीही तिखट आणि रागावणारी असली तरी ,
अन कधीच मला न विसरणारी आणि मला समजून घेणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……

CaringBridge is a nonprofit social network dedicated to helping family and friends communicate with and support loved ones during a health journey. Learn more about CaringBridge.

To interact with Sunil’s website, sign in or register today.

By registering with CaringBridge, you will join over 300,000 people a day who are supporting friends and family members.

Sign In Or Register
SVG_Icons_Back_To_Top
Top